Ad will apear here
Next
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जागतिक स्तनपान सप्ताह साजरा
ठाणे : स्तनपानाचे महत्त्व सांगणारे पोस्टर्स, घोषवाक्य स्पर्धा, कार्यशाळा आणि चर्चासत्र आणि स्तनपानाचे महत्त्व सांगणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करून महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला.

स्तनपान सप्ताह सांगता कार्यक्रमासाठी महापौर मीनाक्षी राजेंद्र शिंदे, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, नगरसेविका अपर्णा साळवी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राम केंद्रे, अधिष्ठाता डॉ. संध्या खडसे, बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. वंदना कुमावत इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

स्तनदा मातांना स्तनपान करण्यास प्रवृत्त करणे, कुटुंबातील सदस्यांनी मातांना स्तनपानासाठी वेळ उपलब्ध करून देणे, इतर कामातून मुक्त ठेवणे, स्तनपान करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे, तसेच स्तनदा मातांना कुटुंबातील वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना साह्य करणे गरजेचे आहे, अशी मते मान्यवरांनी आपल्या भाषणात व्यक्त केली.

या कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, श्रीमती मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी, कर्मचारी आणि डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZTOBF
Similar Posts
महावृक्षारोपण अभियानांतर्गत तीन लाख वृक्ष लागवडीचा ठाणे महानगरपालिकेचा संकल्प ठाणे : महाराष्ट्र सरकारने वन विभागाच्या माध्यमातून २०१७मध्ये एक जुलै ते सात जुलै या कालावधीत चार कोटी वृक्ष लावण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्याअंतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या वतीने चालू वर्षात एकूण तीन लाख वृक्ष लागवड करण्याचे नियोजन केले असून, त्यापैकी दोन लाख वृक्ष वनविकास महामंडळ या तज्ज्ञ संस्थेकडून लावण्यात येणार आहेत
‘ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन २०१७’च्या कक्ष कार्यालयाचे उद्घाटन ठाणे : ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने १३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ‘ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन’ स्पर्धेच्या कार्यालयाचे उद्घाटन महापौर मीनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या हस्ते झाले. स्पर्धेसाठी स्पर्धकांना नोंदणी करता यावी, तसेच स्पर्धेबाबत मार्गदर्शन मिळावे, यासाठी ठाणे महानगरपालिकेतील
नारायणराव कोळी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन ठाणे : ठाण्याचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय नारायणराव गोविंद कोळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ठाणे महानगरपालिकेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे त्यांच्या प्रतिमेला व कोपरीच्या चेंदणी कोळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्याला महापौर मीनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला
ठाण्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मिळणार गती ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात खासगी व लोकसहभागातून उभारण्यात येणाऱ्या २० एमएलडी क्षमतेच्या पाणी विक्षारण आणि १० मेगावॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प या दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या सामंजस्य करारावर नुकतीच स्वाक्षरी करण्यात आली. अशा पद्धतीचे प्रकल्प राबविणारी ठाणे महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language